साध्वीचे तोंड काळे करणार्‍या गावांना बक्षीस - ‘भीम आर्मी’ची घोषणा

    दिनांक :24-Apr-2019
मुंबई:  शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणार्‍या साध्वी प्रज्ञािंसह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणार्‍या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने पाच लाखांचा पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी आज बुधवारी केली.
 

 
 
शहीद हेमंत करकरे यांच्यासह देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांचाही अपमान करून प्रज्ञािंसह यांनी देशविरोधी मानसिकता स्पष्ट केली आहे. असे असताना भाजपाने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. भाजपच्या या कृतीवरून त्यांचे देशप्रेम बेगडी असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका कांबळे यांनी केली. संबंधित गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असे कांबळे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.