आता भाजपाही म्हणणार 'लाव रे तो व्हिडीओ'

    दिनांक :24-Apr-2019
 
मुंबई : "लाव रे तो व्हिडीओ" म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर निशाणा साधण्याचे सत्र सध्या काही दिवस तरी सुरूच राहणार आहे. मात्र आता राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे भाजपने ठरवले आहे. राज ठाकरे मांडत असलेल्या मुद्द्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठी भाजपही आपल्या सभेत व्हिडीओ दाखवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
राज ठाकरे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्याच पद्धतीने भाजप २७ तारखेच्या सभेत उत्तर देणार आहे  आमची राज ठाकरेंना विनंती आहे की, २७ एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरु ठेवाव्या. कारण या टुरिंग टॉकीजमुळे जनतेची चांगली करमणूक होत आहे. तसेही राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांची स्टँडअप कॉमेडी सुरु ठेवायला काही हरकत नाही, असा टोला विनोद तावडेंनी लगावला.