आजचे राशी भविष्य, दि. २४ एप्रिल २०१९
   दिनांक :24-Apr-2019
 
 

मेष :  अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. कामात मन लागेल. सकारात्मक विचार ठेवा. मनात आलेल्या गोष्टींचे निराकरण कराल. कोणतीही गोष्ट बेलण्याच्या आधी विचार करा. पैश्यांच्या अडचणींवर मात कराल. राजकारणी व्यक्तींकडून फायदा होण्याची शक्यता आहे.

वृषभ : आज स्वभाव चंचल स्वरूपाचा असेल. वेळेनुसार सर्व अडचणी दूर होतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. अडकलेली कामे साथीदाराच्या मदतीने पार पडतील. उत्पन्न आणि खर्च सम स्वरूपात राहिल.

मिथुन : मित्र आणि भावंडांकडून सहकार्य मिळेल. अचानक काही महत्वाचे काम करावे लागेल. लवकर पूर्ण होणारी कामे आज करा. खूप कामे तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांना कामाने खूश कराल.

कर्क : दिवस उत्साहीत असणार आहे. जबाबदाऱ्यांमुळे दिवस व्यस्त असेल. व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करा. जुने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीपेक्षा व्यावसाय करण्याऱ्यांचा उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

सिंह : कामात होणाऱ्या मोठ्या कामांचे परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. नवीन प्रेम प्रकरण सुरू होण्याची शक्यता आहे. पैश्याबाबत आपल्या मनात काही योजना असतील. जुन्या मित्रांना भेटण्याचे योग आहेत. कामाच्या बाबतीत प्रवास होण्याची शक्यता आहे.

कन्या : व्यावसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. महत्वाकांक्षा वाढेल. जवळच्या व्यक्तींना महत्वाच्या कामांसाठी तुमची गरज भासण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग आहेत. कामात येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील. काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तुळ : कुटुंब आणि पैश्यांकडे लक्ष असेल. संधीचा फायदा उचलण्याचे प्रयत्न कराल. सर्व कामे सहज आणि वेळेत पूर्ण कराल. ऑफिसमध्ये अनेक पुरस्कांनी सन्मानीत करण्याची शक्यता आहे. धन लाभ होण्याची शक्यता आहे. घरातल्या मंडळींकडून सहकार्य मिळेल.

वृश्चिक :  पैसा कमावण्याच्या नव्या संधी समोर येतील. पैशांमुळे तुमची मोठी समस्या सुटण्याचा योग आहे. व्यवसायात मोठा फायदा मिळेल. मित्रांची मदत मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी कराल.

धनु : दिवस चांगला असेल. नवीन जमीन अथवा घर खरेदी करण्याचा विचार करू शकता. कुटुंब आणि मित्रांवर खर्च कराल. कामकाजात यश मिळवाल. विचार केलेली कामे पूर्ण कराल. त्यामुळे मन प्रसन्न राहिल. कामांमुळे प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

मकर : कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. मेहनतीने धनलाभ होईल. गेल्या काही दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामं होतील. दिवस चांगला आहे. अनेक कामात सक्रिय राहाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागू शकतात. 

कुंभ : चांगली बातमी कानावर येण्याची शक्यता आहे. अपूर्ण आणि अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. रोजच्या कामांचा फायदा होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामात यश मिळू शकेल. सहऱ्यांसोबत मिळून केलेले काम अयशस्वी ठरेल.

मीन : पुढे जाण्यासाठी अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. पैश्यांच्या बाबतीत खोल विचार करा. सकारात्मक विचार करा. महत्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोण्या नवीन व्यक्ती प्रति आकर्षित व्हाल. नवीन व्यक्तींबरोबर भेटी आणि मैत्रि होण्याची शक्यता आहे. उत्पन्न सामन्य असेल.