आजचे राशी भविष्य, दि. २५ एप्रिल २०१९
   दिनांक :24-Apr-2019
 

मेष - तुमच्या काम आणि बोलण्याने लोकांवर प्रभाव पाडू शकाल. काही लोक तुमची मदत करतील. पैशांच्या बाबतीत स्वत:वर विश्वास ठेवा. लोकांनी केलेल्या मदतीमुळे फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. खरेदीसाठी दिवस चांगला नाही. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ - एखादं काम संपवण्यासाठी अधिक धावपळ करावी लागेल. तब्येतीच्या समस्येसह काही खास गोष्टीबाबतही टेन्शन राहील. जुना आजार बळावेल. वायफळ कामांसाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. सकारात्मक राहाल. नवीन लोकांशी मैत्री होईल. आत्मविश्वास राहील.

मिथुन - मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. केलेल्या कामांचा फायदा होईल. नवीन लोकांशी ओळखी होतील. आत्मविश्वास वाढेल. काही कामांबाबत अनिश्चितता वाटेल. वायफळ खर्च होईल.

कर्क - जुन्या कामातून फायदा होईल. दररोजची कामं वेळेत पूर्ण होतील. व्यवसायात गुंतवणूकीमुळे फायदा होईल. जोडीदाराला वेळ द्या. जोडीदारासोबत पैसे आणि तब्येतीच्या बाबतीत चर्चा होईल. वैवाहिक आयुष्यासाठी दिवस चांगाला आहे. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम लवकर पूर्ण होईल. तुमच्याशी धोका होण्याचा संभव आहे. सावध आहे.

सिंह - कोणतेही महत्त्वपूर्ण काम आज करु नका. नशिबावर, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. नवीन विचार असल्यास तेही काम करु नका. जुनी कामं संपवण्याचा प्रयत्न करा. तब्येतीच्या समस्या कमी होतील. नवीन लोकांशी ओळखी होतील.

कन्या - नोकरदार वर्गाला नशीबाची साथ मिळेल. व्यवसायात स्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. काम पूर्ण होतील. केलेल्या कामामुळे धनलाभ, फायदा होईल. नवीन संधी समोर येतील. तुमच्या कामाने अधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. पैशांची समस्या संपेल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल.

तुळ - तुमच्या कामाकडे तसेच रोजगाराकडे लक्ष द्या. काम बदलण्याचा विचार मनात येईल. दररोजची कामं पूर्ण होतील. काम परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न कराल. वेळेत कामावर जाण्याचा प्रयत्न करा. कोणालाही तक्रार करण्याची संधी देऊ नका. नातेसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. नवीन व्यक्तीशी मैत्री होईल. नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. धावपळ होईल. उगाच, लहान गोष्टींवर रागावल्याने नुकसान होऊ शकते.

वृश्चिक - काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरी, व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामांसाठी केलेल्या योजनांमुळे पुढे फायदा होईल. नको असूनही अनेक जबाबदाऱ्या सांभाळव्या लागू शकतात.

धनु - जवळच्या किंवा महत्त्वाच्या नात्यात काही कारणास्तव संबंध बिघडण्याची शक्यता आहे. खर्च करताना स्वत:वर नियंत्रण ठेवा. पैसे कमावण्यासाठी काही चांगल्या संधी मिळतील. कुटुंबाच्या तसेच मुलांच्या गरजांवर लक्ष द्यावे लागेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

मकर - जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. भावनिक राहाल. सकारात्मक राहाल तर फायदा होईल. उत्साही राहा तसेच दुसऱ्यांनाही खुश ठेवा. अनेक कौटुंबिक गोष्टींवर मार्ग काढाल. कामं पूर्ण होतील. आनंदी राहाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणे टाळा. वाद-विवादापासून लांब राहा.

कुंभ - मित्रांसोबत एखाद्या गंभीर गोष्टीवर चर्चा होऊ शकते. ऑफिसमध्ये प्रसन्नता आणि आपुलकीच्या भावनेनने काही लोक तुमच्याशी जोडले जातील. पैशांच्या परिस्थितीवर विचार करा आणि भविष्यासाठी योजना आखा. कामात वाढ होईल.

मीन - तुम्ही विचार करत असलेली इच्छा पूर्ण होईल. कुटुंबाची साथ मिळेल. उत्साहात काम कराल तर फायदा होईल. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. कोणत्याही गोष्टीसाठी जिद्द करु नका. वायफळ खर्च होईल.