शेन लॉंगने नोंदविला सर्वाधिक वेगवान गोल

    दिनांक :24-Apr-2019

 

साऊदम्पटन, 
प्रीमियर लीग फुटबॉलच्या इतिहासात साऊदम्पटनचा स्ट्रायकर शेन लॉंगने सर्वाधिक वेगवान गोल नोंदविला. साऊदम्पटन व वॉटफोर्ड यांच्यातील 1-1 गोलने बरोबरीत राहिलेल्या सामन्यात शेन लॉंगने अवघ्या 7.69 सेकंदात हागोल नोंदविला. नंतर आंद्रे ग्रे याने गोल नोंदवून वॉटफोडला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. 32 वर्षीय शेन लॉंगने यापूर्वीचा लिडले किंगने केलेल्या कामगिरीला मागे टाकले. डिसेंबर 2000 मध्ये प्रीमियर लीगमध्ये ब्रॅडफोडविरुद्धच्या सामन्यात टोटेनहॅमचा डिफेंडर लिडले किंगने 9.9 सेकंदात वेगवान गोल नोंदविण्याची कामगिरी केली होती.