डि'व्हिलियर्सने चक्क एका हाताने मारला षटकार आणि...

    दिनांक :25-Apr-2019
बंगळुरु:
रॉयल चॅलेंजर्सच्या  डि'व्हिलियर्सने ४४ चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ८२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीमध्ये डि'व्हिलियर्सने चक्क एका हाताने षटकार मारला आणि हा चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.
 
 
ही गोष्ट घडली सामन्याच्या १९व्या षटकात. मोहम्मद शमी हे षटक टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डि'व्हिलियर्सने एक फटका मारला. त्यानंतर तो चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.एबी डि'व्हिलियर्सच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे २०३ धावांचे आव्हान ठेवता आले.
 
 
 
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी आक्रमक सुरुवात केली. पण कोहलीला यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कोहली १३ धावा करून बाद झाला. त्यानंतर पटेल आणि डि'व्हिलियर्स यांची चांगलीच जोडी जमली. पण पटेलला अर्धशतक झळकावण्यात अपयश आले. पटेल बाद झाल्यावर आरसीबीची मधली फळी कोसळली. यावेळी डि'व्हिलियर्सने संघाला सावरले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.