कूऽऽल फॅशन
   दिनांक :25-Apr-2019
फॅनिस्टा
- सृष्टी परचाके
उन्हाळ्यात आऊटफिट निवडताना बराच गोंधळ होतो. तसेच शोभणारे फुटवेयर आणि मेकअपचे योग्य निवड करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. उन्हाळा म्हणजे रखरखत ऊन, उष्णतेमुळे अंगाची झालेली लाही आणि घशाला पडलेला कोरड हे जणू समीकरणचं झाले आहे. असे असले तरीदेखील हाच असा एकमेव ऋतू आहे, ज्यामध्ये आपण विविध स्टाईलिश आऊटफिट परिधान करू शकतो. त्यामुळे सध्याच्या काळात उन्हाळा म्हणजे फॅशनच्या दृष्टीने खरा ऋतू आहे. उन्हाळ्याचे दिवस अगदी प्रत्येकालाच नकोसे वाटत असतात.
 
भर दुपारी उन्हामध्ये जर कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर मग विचारायलाच नको. रखरख उन्हामध्ये घराबाहेर जाणं आपण टाळत असतो. उन्हामुळे सतत येणारा घाम आणि त्यामुळे येणारा चिकचिकाट प्रत्येकालाच असहाय्य करत असतो. त्यामुळे या दिवसात शक्यतो सारेच जण आरामदायी कपडे परिधान करीत असतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात ‘कुल’ राहण्याचे काही पर्याय असून लूक आरामदायक आणि स्टाईलिश कसे बनवता येईल, हे आज आपण पाहू या.
 
हाय हिल्स : उन्हाळ्यामध्ये कुल लूक हवा असेल तर हाय हिल्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण सॅण्डल, चप्पल यांचा वापर करत असतो. मात्र या स्टाईलचा कंटाळा आला असेल, तर हाय हिल्स हा उत्तम पर्याय आहे. हाय हिल्समध्ये स्टिलेटोस आणि प्लॅटफॉर्म उत्तम आहे. मॅक्सी ड्रेसवर स्टिलेटोस शोभून दिसतात. वेजेस, ब्लॉक आणि स्ट्रीप-प्लॅटफॉर्म सारखे पर्याय उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. हाय हिल्स परिधान करताना फिक्कट रंगाचे निवड करावे. न्यूड आणि गुलाबी रंगामुळे गर्मी होत नाही.
 
बॉडी फिटेड ड्रेसेस : अनेक वेळा उन्हाळ्यामध्ये आपण फिक्कट रंगाचे किंवा सैलसर कपड्यांची निवड करतो. मात्र या उन्हाळ्यात कूल दिसायचे असेल तर बॉडी फिटेड ड्रेसेस नक्की ट्राय करून बघा. जर तुमचा बांधा सडपातळ असेल तर बॉडी फिटेड ड्रेसेस हा उत्तम पर्याय आहे. या ड्रेसमध्ये तुमचे सौदर्यं खुलून येत. त्यासोबतच यातदेखील फिक्कट रंग किंवा कॉटनचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे उन्हाळ्यात होणार्‍या समस्या यामध्ये निर्माण होणार नाहीत. बॉडी फिटेड ड्रेसमध्ये स्कर्ट, शर्ट आणि ट्युनिक हे पर्याय उपलब्ध आहेत. स्टाईलिश दिसण्यासाठी िंप्रटमध्ये चेक्स आणि ब्लॉक्स पॅटर्नचे निवड करता येते.
 
बुफान्ट हेअरस्टाईल
उन्हाळ्यामध्ये मानेवर घाम येत असल्यामुळे आपण केसवर बांधतो. सतत केस बांधून राहिल्यामुळे केसांमध्ये घाम येतो.   सोबतच केसांमध्ये चिकचिकाट निर्माण होतो. या सार्‍यामुळे केसांना विशिष्ट प्रकारचा उग्र वास येतो. या सार्‍या कटकटीपासून सुटका करायची असेल तर बुफान्ट हेअरस्टाईल निवडावे. 60 च्या दशकामध्ये ही हेअरस्टाईल प्रचंड प्रसिद्ध होती. तिचं हेअरस्टाईल आता नव्याने सुरू झाली आहे. या हेअरस्टाईलमध्ये केसांचा थोडासा उंचवटा करून ते बांधले जातात. या पद्धतीने केस बांधल्यानंतर ते एखाद्या मुकुटाप्रमाणे दिसते. विशेष म्हणजे या पद्धतीने केस बांधल्यामुळे डोक्यावर जास्त घाम येत नाही. या व्यतिरिक्त हाय पोनीटेल आणि बन हेयरस्टाईलसारखे पर्याय ही उन्हाळ्यात उपलब्ध आहे.
 
वनपीस ड्रेसेस
उन्हाळ्यामध्ये मुली सैल कपडे घालणे पसंत करतात. त्यामध्ये उत्तम पर्याय म्हणजे वनपीस ड्रेस. यामध्ये काही पूर्ण बाह्यांचे तर काही स्लिव्हलेस (बाह्या नसलेले) असे काही आकर्षक वनपीस सौम्य रंगामध्ये उपलब्ध आहेत. बाह्यांमध्ये विविध पर्याय बाजारात उपलब्ध असून सध्या कोल्ड शोल्डर असलेले ड्रेसेस तरुणींमध्ये प्रसिद्ध आहे. बोहो पॅटर्नचे ड्रेसेस महिला उत्तम असून यामध्ये सौम्य रंगाचे निवड करणे आवश्यक असते.