ISSF World Cup : अंजुम मुद्गील, दिव्यांश सिंहला सुवर्णपदक

    दिनांक :25-Apr-2019
चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गील आणि दिव्यांश सिंहने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर रायफल मिश्र प्रकारात भारतीय जोडीने हे सुवर्णपदक कमावले आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीला चीनच्या लियु रक्सन आणि यांग हाओरानने चांगलंच झुंजवलं.
 
 
काही क्षणांपर्यंत चीनच्या जोडीकडे १३-११ अशी दोन गुणांची आघाडी होती. मात्र अंजुम आणि दिव्यांशने दणक्यात पुनरागमन करत १५-१५ अशी बरोबरी साधली. यानंतर चीनी जोडीला बॅकफूटला ढकलत भारतीय जोडीने १७-१५ अशी आघाडी घेत सुवर्णपदक आपल्या खिशात टाकले. रशियाच्या युलिया कारिमोव्हा आणि ग्रिगोरी शामकोव्ह जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.