आता महाराष्ट्र पोलिस घालणार नवीन टोपी

    दिनांक :25-Apr-2019
- गणवेशात बेसबॉल प्रकारातील नव्या टोपीचा समावेश

 
मुंबई,
महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात आता नव्या टोपीचा समावेश करण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी स्वाक्षरी केलेले परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
 

 
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दैनंदिन कामकाज पार पाडत असताना, या नवीन टोपीची डोक्यावरील पकड घट्ट असल्यामुळे ती उपलब्ध करण्याचे आदेश महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या विभागातर्फे कळविण्यात आले आहे. तसेच बेसबॉल प्रकारातील या टोपीचा पोलिसांच्या गणवेशात अतिरिक्त टोपी म्हणून समावेश करण्यात आला असल्याचे या परिपत्रकात म्हंटले आहे. त्यामुळे उन्हापासून देखील पोलीस कर्मचाऱ्यांचे काही प्रमाणात संरक्षण होणार आहे.