परिणीती थिरकली निक जोनासच्या गाण्यावर
   दिनांक :25-Apr-2019
हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक निक जोनास याच्या ‘सकर’ या गाण्यावर परिणीती चोप्रा हिने ताल धरला असून परिणीतीचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रियांका चोप्राने ही या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

 
 
परिणीती चोप्रा सध्या सायना नेहवालच्या बायोपिकच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रीकरणादरम्यान एका क्षणी रिलॅक्स होण्यासाठी परिणीतीने निक जोनासच्या गाण्यावर ठेका धरला आहे. परिणीतने नंतर हा डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच निक जोनासला हा डान्स कसा वाटला असा प्रश्नही परिणीतीने विचारला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून परिणीतीची मोठी बहिण प्रियांका चोप्रा आणि निक जोनास दोघांनीही परिणीतीचं कौतुक केलं आहे.