तैमूर बाबांसारखाच खोडकर : करिना
   दिनांक :25-Apr-2019
मुंबई,
सैफ-करिनाचा 'छोटा नवाब' तैमूर नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडचा लोकप्रिय 'स्टारकिड' अशी ओळखच त्याला मिळाली आहे. सैफ आणि करिनाही तैमूरबद्दल नवनव्या गोष्टी मीडियापुढं आणत असतात. त्यामुळं त्याच्याबद्दलची चर्चा अधिकच वाढते. अलीकडंच एका मुलाखतीत करिनानं सैफ आणि तैमूरच्या स्वभावातील सारखेपणाचा उलगडा केला. 'तैमूर हा त्याच्या बाबांसारखाच खोडकर आहे', असं तिनं सांगितलंय.

 
 
'तैमूर हा खूप उपद्व्यापी आणि खोडकर आहे. अगदी त्याच्या बाबांसारखा. त्याला एखादी गोष्ट सांगितली की तो ऐकतो आणि तसा वागतो. पण आम्हालाही तसंच करायला सांगतो, असं करिना म्हणाली. 'आई असणं हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव आहे. तैमूरला त्याचे बाबा ओरडले की मी त्याला प्रेमानं जवळ घेते. तैमूरपेक्षा जास्त महत्त्वाचं मला काहीच वाटत नाही. तो आता मोठा होतोय. मीडियातली मंडळी त्याच्याशी प्रेमानं वागतात. हाय-हॅलो करतात. तोही त्यांना प्रतिसाद देतो. मात्र, एवढ्या लहान वयात त्याला फोटो आणि प्रसिद्धीची सवय लागू नये असं वाटतं,' असंही ती म्हणाली.