तनामनाला ताजेपणा देणारा पदिना
   दिनांक :26-Apr-2019
नुसत्या दर्शनाने आणि वासाने मनाला तसेच शरीराला ताजेपणा देणारा पदिना अनेक विकारांवर उत्तम घरगुती हर्बल उपचार ठरू शकतो, याची माहिती अनेकांना असेल. पदिन्याचा ताजा स्वाद आणि सुगंध मेंदूला त्वरित ताजेपणा देतो, याचा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतलाही असेल. विशेष म्हणजे अनेक अनावश्यक औषधांचे सेवन कमी करण्यास हा अल्पमोली आणि बहुगुणी पदिना फारच उपयुक्त आहे.
 
 
संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, माणसाची पचनक्रिया सुधारण्यात पदिना महत्त्वाची कामगिरी बजावतो. पोटाच्या विकारांशी लढण्यास तो उपयुक्त आहेच पण बद्धकोष्ठता, पोटदुखी यातही पदिना फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पुदिन्याची पाने नुसती चावून खाता येतात, त्याचे चूर्ण घेता येते. ताजा पदिना स्वच्छ धुवून नुसता खाल्ला तरी तोंडाला रुची देतो आणि पचन सुधारतो. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा कडक उन्हाचा त्रास होतो. कधी सनस्ट्रोक होतो. ज्यांना उन्हात बाहेर पडणे आवश्यक आहे, त्यांनी घरातून निघताना पदिन्याचा थोडा रस पिऊन बाहेर पडले तर उन्हाचा त्रास होत नाही. पदिन्याचे सेवन चिंता, मानसिक ताण कमी करणारे आहे. त्यातील मेंथोल स्नानू रीलॅक्स करणारे आहे. डोके दुखत असेल तर यामुळेच डोकेदुखी कमी होते तसेच मायग्रेन असेल तर त्यापासून आराम मिळतो. घसा खवखवत असेल तर पुदिना त्यावर आराम देतो.
 
पदिना तोंडाला ताजेपणा देतो. त्यामुळे श्वास दुर्गंधी कमी होते. पदिन्यातील मेंथोलमुळे फ्रेशनेस मिळतो. यामुळेच बहुतेक माऊथ फ्रेशनरमध्ये पदिना वापरला जातो. पुदिना बॅक्टेरीयांबरोबर लढणारा आहे. त्यामुळे तोंडचा घाणेरडा वास कमी होतो. डोकेदुखीत कपाळावर पदिना तेल चोळले किंवा पदिना घातलेला चहा प्यायला तर त्वरित आराम मिळतो. पदिना सौंदर्यवाढीसाठी उपयुक्त आहे. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये पदिना वापरला जातो. तो त्वचेच्या पेशींना नवीन ऊर्जा देणारा आणि त्वचा ओलसर ठेवणारा आहे.
 
पदिना घरातील कुंडीत सहज लावता येतो, त्यामुळे दररोज ताजा पदिना मिळू शकतो. पदिन्याची सामोशाबरोबर दिली जाणारी चटणी केवळ रुची वाढवत नाही तर जंक फुड सहज पचण्यासाठीही काम करते. ताप कमी करण्यासठी तसेच सूज कमी करण्यासाठी पदिना वापरला जातो तसेच कीटक चावल्यामुळे येणारी सूज आणि जळजळ पदिन्याची पाने नुसती चाव्याच्या ठिकाणी रगडली तरी कमी होते. पदिना नुसती पाने, ज्यूस, अर्क अशा विविध प्रकारे वापरता येतो.