'ॲव्हेन्जर्स एन्डगेम' बघताना चाहत्यांच्या डोळ्यात पाणी
   दिनांक :26-Apr-2019
मुंबई,
सिनेरसिकांना वाट पहायला लावणारा 'ॲव्हेन्जर्स एन्डगेम' हा चित्रपट अखेर आज, २६ एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल सिनेरसिकांच्या मनात असणारी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. काही ठिकाणी तर या चित्रपटाचे एक तिकीट २,४०० रुपयाला विकले जात होते व तरीही जवळपास सगळे शोज हाउसफुल झाले आहे. सिनेरसिकांना हा चित्रपट फार आवडला आहे. सिनेरसिकांना आकर्षित करण्यात ॲक्शन्स सोबतच भावभावनांचं संवेदनशील प्रदर्शन हा सुद्धा ॲव्हेन्जर्स सिरीजच्या चित्रपटांचा महत्वाचा भाग मानला जातो. 'ॲव्हेन्जर्स एन्डगेम' ने तर यावेळी चक्क चाहत्यांच्या डोळ्यातून पाणी काढलं आहे.
 
 
'ॲव्हेन्जर्स एन्डगेम' पाहून आलेल्या चाहत्यांनी चित्रपट बघताना आलेले भावुक अनुभव ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. 'अश्या सुपरहिरो सिनेमांसाठी माझ्या डोळ्यात पूर्वी कधी पाणी आलं नाही. हा चित्रपट आपल्या सगळ्या अपेक्षांच्या पुढचा आहे. माझ्या मते हा आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी सिनेमा आहे. हा चित्रपट शक्यतो इंग्रजी भाषेतच पहावा. मी आणखी एकदा हा चित्रपट पहाणार आहे.' अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने ट्विटरवर दिली आहे. या आणि अशा अनेक प्रतिक्रिया ट्विटरवर पहायला मिळतात.