'ॲव्हेंजर्सः एण्डगेम'ची पहिल्याच दिवशी 1200 कोटींची कमाई
   दिनांक :26-Apr-2019
'अॅव्हेंजर्सः एण्डगेम'मध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, क्रिस इवान्स, मार्क रुफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट योहान्सन आणि ब्री लारसन यांची प्रमुख भूमिका आहे. 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम' हा मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा 22वा चित्रपट आहे. याआधी 'कॅप्टन मार्वेल' प्रदर्शित झाला होता. अमेरिकन कॉमिक बुक्सचे आणि मार्वेलचे लेखक स्टॅन ली यांनीदेखील मृत्यूपूर्वी एण्डगेममध्ये कॅमिओ केला आहे.
 
 
दहा लाख तिकीटांचं अॅडव्हान्स बुकिंग
तिकीट विक्रीच्या बाबतीत 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम' नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुकमायशोच्या माहितीनुसार, एकाच दिवशी 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम'च्या 10 लाखांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली आहे. प्रति सेंकद 18 तिकीटं या वेगात विक्री झाली आहे. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
सर्वात महागड्या तिकीटाची विक्री
अॅव्हेंजर्सचे चाहतेही या सिनेमाच्या तिकीटावर पैसे खर्च करत आहेत. आतापर्यंत या सिनेमाच्या सर्वात महागड्या तिकीटाची विक्री झाली आहे. तब्बल 2400 रुपयांना तिकीट विकलं गेलं आहे. दिल्लीतील एका थिएटरमध्ये या सिनेमाचं तिकीट सर्वात महागडं होतं. मुंबईत सर्वात महागडं तिकीट आयनॉक्सने विकलं होतं. या तिकीटाची किंमत होती 1765 रुपये. आतापर्यंत आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या तिकीटासाठी एवढात दर निश्चित करण्यात आला होता. पण ते देखील 1500 रुपयांना विकलं गेलं.
'अॅव्हेंजर्सः एण्डगेम' सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड्स ब्रेक करण्याच्या मार्गावर आहे. चित्रपट प्रदर्शित होताच याची कमाई 1200 कोटींपर्यंत पोहोचली. यातील केवळ चायनाचा वाटा आहे. एण्डगेमसाठी मोठं मार्केट ठरलेल्या चायनासोबतच साऊथ कोरियामध्ये 8.4 मिलियन डॉलर्स, ऑस्ट्रेलियामध्ये 7 मिलियन डॉलर्स, फ्रान्समध्ये 6 मिलियन डॉलर्स, इटलीत 5.8 मिलियन डॉलर्स, तर जर्मनीमध्ये 5.6 मिलियन डॉलर्स इतकी कमाई झाली.