निवडणुकीच्या सट्टा बाजारात विजयाच्या दरात चढउतार
   दिनांक :26-Apr-2019
 
प्रभागनिहाय टक्केवारी काढणे सुरू
 
नागपूर: पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सट्टा बाजारात असलेली उलाढाल आता आणखी वाढल्याचे चित्र आहे. रामटेकमध्ये गावनिहाय तर नागपुरात प्रभागनिहाय टक्केवारी प्राप्त झाल्यानंतर दरात सतत बदल होताना दिसत आहे. मतमोजणी एक महिन्याने होणार आहे. तोपर्यंत उमेदवारांच्या विजयाच्या दरात चढउतार होत राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीत यंदा चांगलीच चुरस दिसून आली. दुहेरी लढतीमुळे अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी एकमेकांमध्ये पैजा लावल्याची चर्चा आहे. मात्र, त्याहीपेक्षा सट्टा बाजारातील उलाढाल वाढत चालली आहे. सट्टा बाजाराचा कल बघूनही अनेकांनी पैजा लावल्या आहेत. अनेकांकडून सट्टा बाजारातील उमेदवारनिहाय मिळणा‍èया दरानुसार विजयाचे दावेही केले जात आहेत. सध्या सट्टा बाजारात केवळ उमेदवारांच्या विजयावरच नव्हे, तर त्याच्या लीडवरही सट्टा लावला जात आहे. शिवाय गावनिहाय, प्रभागनिहाय, विधानसभा मतदारसंघनिहाय मिळणारी मते आणि आघाडी यावरही सट्टा लावला जात आहे.
 

 
 
मतदान होण्यापूर्वी सट्टा बाजारात असलेले चित्र मतदानानंतर मात्र पूर्णपणे बदलल्याचे दिसून येत आहे. सट्टा बाजारात मात्र दुरंगी लढत असल्याचेच चित्र आहे. त्यामध्ये त्या दोन्ही उमेदवारांना मिळणा‍èया दरात मात्र रोज बदल होत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे सट्टा बाजाराच्या हवाल्यावर विजयाचे दावे करणारे मात्र यंदाच्या निवडणुकीवेळी सावध दावे करताना दिसत आहेत. शिवाय सट्टा बाजारातील दरात होणारे चढउतार यामुळे त्याच्याशी संबंधितांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. मतदान झाल्यानंतर एक महिन्याने मतमोजणी होणार असल्याने तोपर्यंत सट्टा बाजारातील उलाढाल सुरूच राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण मे महिना हा बाजार गरम राहणार आहे.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सट्टा लावणा‍èयांनी जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. शिवाय कोणत्या नेत्याने आतबाहेर केले, याचाही कानोसा सट्टेबाजांकडून घेतला जात आहे. या सर्व बाबींचा अंदाज आल्यानंतर पुढच्या आठवड्यात सट्टा बाजारातील उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या मात्र दोन उमेदवारांमध्येच काट्याची लढत होत असल्याचे दरावरून दिसून येते. येत्या काळात तेही चित्र बदलेल, अशी सट्टेबाजांना आशा आहे.