ICC World Cup 2019; 'पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल '

    दिनांक :26-Apr-2019
 भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही वर्ल्ड कप संघातील उपांत्य फेरीतील चार संघ सांगितले आहेत. अनेकांच्या मते भारत आणि यजमान इंग्लंड हे या शर्यतीत आघाडीवर आहेत. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे संघ या स्पर्धेत आश्चर्यकारक निकालाची नोंद करू शकतात, असाही अनेकांचा दावा आहे.
 
 
2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 2019च्या स्पर्धेत भारताचे पारडे जड असल्याचे गांगुलीला वाटते. शिवाय या स्पर्धेत सर्वच संघ तुल्यबळ असल्याचे मत व्यक्त करताना भारतासह पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील, असे गांगुलीने सांगितले.
तो म्हणाला,''भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पण, भारत हा जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असेल. यंदाचा वर्ल्ड कप हा चुरशीचा होणार आहे. अन्य स्पर्धांप्रमाणे येथेही भारताचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. हा वर्ल्ड कप सर्वोत्तम असेल. यापैकी सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. ही स्पर्धा सोपी नक्की नसेल.''