लोकल ट्रेन बफरला धडकली; प्रवासी सुखरूप
   दिनांक :26-Apr-2019
मुंबई, 
 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ( सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बफरला हार्बर मार्गावरील लोकल धडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने लोकलचा वेग कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने बसलेल्या झटक्यामुळे लोकलच्या डब्यांना हादरा बसला. सुदैवाना सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
 

 
आज दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. बोलापूरहून लोकल बफरला धडकल्यानंतर बसलेल्या झटक्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. धडकेमुळे लोकलच्या डब्याचे अलाइनमेंटबी अस्तव्यस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, बेलापूर लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बफरला धडकल्यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या. धडकलेली लोकल तातडीने मागे घेत मार्ग मोकळा करण्यात आला. त्या नंतर काही काळ बंद पडलेली हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक काहीशी उशिराने धावत आहेत.