निवडणूक उमेदवार नसलेल्या सभांना महत्त्व नाही - आदित्य ठाकरे

    दिनांक :26-Apr-2019
 मुंबई: ज्यांचे निवडणुकीत उमेदवारच उभे नाहीत, अशा सभांना काही महत्त्व नसते, अशी टीका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
 

 
 
राज ठाकरेंनी बुधवारी भांडुपमध्ये सभा घेतली होती. त्यात त्यांनी युतीवर आरोप केले. गुरुवारी आदित्य ठाकरेंनी ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी रोड शो केला. संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहोल आहे. मतदार धनुष्यबाण आणि कमळ ही दोन बटणं सोडून दुसरी कोणतीही बटण दाबत नसल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. जनतेला सत्ताधारी पक्षच हवा आहे. नुसती ईशान्य मुंबई नव्हे तर संपूर्ण मुंबईत सेना-भाजपाचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वीही आदित्य यांनी, सेना आणि भाजपाची भूमिका वर्षानुवर्षे कायम आहे. जे विरोधात आहेत, सतत भूमिका बदलतात, त्यांच्यासोबत आपण गेलेलो नाही, असे वक्तव्य केले होते.