अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलेला रंगेहात पकडले
    दिनांक :26-Apr-2019
गिरड: परीसरातिल मंगरूड येथिल युवाकांना गावातिल एका महिलेवर अवैध दारू विक्री करत असल्याचा संशय आल्याने युवाकांनी २५ एफ्रिलला रात्री ९ वाजता तिच्यावर नंजर ठेवत पाहणी केली असता त्यांच्या जवळ देशी दारूच्या १० सिलबंद शिश्या आढळून आल्या या वेळी युकांनी तिला रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या हवाले केले.

 
 
मंगरूड येथिल महिलांनी गावात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीवर गावातील युवकाच्या मद्दतिने आळा घातला. मात्र गेल्या दोन दिवसा पूर्वी येथे जुने अवैध दारू विक्रेते समुंदर सिंह अकाली व त्याची पत्नी आशा समुंदर सिंह अकाली हे गावात परत आले व त्यांना गावात दारू बंदी आहे ही कल्पना असतांना सुद्धा त्यांनी गावातील अवैद्य चिल्लर दारू विकायला सुरुवात केली. याची माहिती महिला व युवकांना मिळाली असता त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवून रात्री समुंदर सिंग अकाली या महिलेला दारू विक्री करतात रंगेहात पकडत या संबंधी गिरड पोलिस ठाण्यात फोन करून पोलिसांना माहिती दिली.या वेळी पोलिस कर्मचारी प्रशांत ठोंबरे यांनी मंगरुड गाठून महिच्या घरी एका डब्यात भरून ठेवलेल्या देशी दारूच्या १० सिलबंद शिश्या जप्त केल्या. या वेळी घटनास्थानी पोलीस पाटील अरविंद जोगवे सह गावातील दारूबंदी महिला मंडळाच्या महिला व युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी आरोपि महिला समुंदर सिंग अकाली यांना आज सकाळी अटक केली. पुढिल तपास गिरड पोलीस करीत आहे.