'हा' विक्रम करणारा रियान पहिलाच फलंदाज

    दिनांक :26-Apr-2019
युवा रियान परागने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने, कोलकाता नाईट रायडर्सवर ३ गडी राखून मात केली आहे. एका क्षणाला संकटात सापडलेल्या राजस्थानच्या संघाने विजयासाठी दिलेले १७६ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत असताना रियान परागने अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरसोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
 
 
विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना पराग ४७ धावांवर हिट विकेट झाला. त्याने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि २ षटकार लगावले. केवळ ३ धावांमुळे त्याचा एक विक्रम हुकला. IPL च्या इतिहासात सर्वात तरुण अर्धशतकवीर होण्याची संधी त्याच्याकडून हुकली. पण या हंगामात त्याने एक विक्रम केला. या हंगामात हिट विकेट होणारा रियान पहिलाच फलंदाज ठरला.
दरम्यान, एका क्षणाला संकटात सापडलेल्या राजस्थानच्या संघाने विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं आव्हान रियानच्या फलंदाजीमुळे पूर्ण केले. ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत असताना रियान परागने अखेरच्या काही षटकांत जोफ्रा आर्चरसोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.