शेन वॉटसनची निवृत्तीची घोषणा

    दिनांक :26-Apr-2019
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने, स्थानिक बिग बॅश लीग स्पर्धेमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉटसन बिग बॅश लिगमध्ये सिडनी थंडर संघाचा कर्णधार होता. मात्र आपल्या परिवारासोबत वेळ घालवता यावा यासाठी आपण निवृत्ती घेत असल्याचे वॉटसनने जाहीर केले.
 
 
३७ वर्षीय वॉटसनने सलग ४ वर्ष सिडनी थंडर संघांचं प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी वॉटसनने सिडनी थंडरच्या संघ प्रशासनाचे आभार मानले. सिडनी थंडरकडून शेन वॉटसनने सर्वाधिक १ हजार १४ धावा करण्याचा बहुमान मिळवला आहे. याव्यतिरीक्त वॉटसनच्या नावावर १९ बळीही जमा आहेत. सध्या वॉटसन आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत आहे.