श्रीलंका बॉम्बस्फोट; मृतांचा आकडा घटविला, ४ संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध
   दिनांक :26-Apr-2019
कोलंबो,
 श्रीलंकेतील २१ एप्रिलला झालेल्या साखऴी बॉम्बस्फोटांमधील सरकारने मृतांचा आकडा ३५९ असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता या हल्ल्यात २५३ जण ठार झाल्याचे श्रीलंका सरकारने जाहीर केले आहे.
 
 
 
 
याचबरोबर पोलिसांनी ४ संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून यामध्ये दोन महिला आहेत. गुरुवारी श्रीलंकेने ३९ देशांच्या नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा बंद केली आहे. कोलंबोवरील हल्ल्यामध्ये नऊ दहशतवादी हे तेथील स्थानिक संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) ची असण्याती शक्यता आहे. याच दहशतवाद्यांनी स्फोटके चर्च आणि हॉटेलांमध्ये पोहोचविल्याचा संशय व्यक्त होत आहे.
 
 

 
तसेच या साखळी बॉम्बस्फोटांमागे परदेशी शक्तींचा हात असल्याचे समोर आल्याने व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधाही त्यांनी रद्द केली आहे. अशा प्रकारची सुविधा ३९ देशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही सुविधा रद्द करण्यात आली आहे. तपासामध्ये परदेशी शक्तींचे धागेदोरे सापडले आहेत. अशावेळी या सुविधेचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.