24 तास सुरु राहणार चित्रपटगृह
   दिनांक :26-Apr-2019
मुंबई,
जे कोणत्याच भारतीय सिनेमाला जमलं नाही ते 'ॲव्हेंजर्स: एण्डगेम'ने करुन दाखवलं आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला असा छप्परतोड प्रतिसाद मिळतोय की या सिनेमाचे शोज 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत उशिरात उशिरा म्हणजे रात्री 11.30 ला शो व्हायचा आणि परवानगी तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. पण 'एण्डगेम'ला काही लिमिटच नाही. रात्री 12, 1, 2, 3 अहो पहाटे चारच्या शोला सुद्धा बुकिंग सुरु झालं आहे.

 
 
हा पराक्रम भारतीय सिनेमाला करता आला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जगात सर्वात जास्त सिनेमाची निर्मिती करणारा आपला देश. तरीही इथे छप्परतोड धंदा करतो तोसातासमुद्रापल्याड बनलेला सिनेमा. अर्थात तो सिनेमा त्या ताकदीचाही असतो. प्रश्न एवढाच की ती ताकद आपल्या सिनेमात कधी दिसणार?