वाडेगाव येथील युवकाचा उष्माघाताने मृत्यू
   दिनांक :26-Apr-2019
पातूर: वाडेगाव येथील ३२ वर्षीय विलास रमेश गोस्वामी यांचा काल उष्माघाताने मृत्यू झाला.  काल अकोल्यात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली तब्बल ४६.३ डिग्री सेल्सियस तापमान गुरुवारी शहरात होते. या रखरखत्या उन्हात विलास गोस्वामी हे काल दिवसभर मुलीच्या शालेय कामाकरिता बाळापुर तहसील कार्यालयात होते. सायंकाळी काम आटोपून व्याळा येथे सासुरवाडीला मुक्कामी पोहचले. रात्री त्यांना अस्वस्थ वाटल्याने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, बहीण व मोठा आप्तपरिवार आहे. हा उष्णतेच्या लाटेने विलास यांचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.