Women's IPL : स्मृतीकडे महिला आयपीएल संघाचे नेतृत्व

    दिनांक :26-Apr-2019
भारतात सुरु असलेल्या आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयने नुकतीच महिला क्रिकेटपटूसाठीही आयपीएल स्पर्धा आयोजित केली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. ६ ते ११ मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ‘वुमन्स टी २० चॅलेंज’ असे या स्पर्धेचे नाव असून या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी हे ३ संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या तीनही संघांमध्ये कोणते खेळाडू खेळणार याबाबत आता चित्र स्पष्ट झाले आहे.
 
 
 स्मृती मंधाना, भारताच्या महिला टी २० क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज या तिघींच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा रंगणार आहे. हरमनप्रीत ही सुपरनोव्हाज संघाची कर्णधार असणार आहे. ट्रेलब्लेझर्स संघाचे नेतृत्व स्मृतीकडे आहे तर मिताली राज ही व्हेलॉसिटी संघाची कर्णधार असणार आहे. प्रत्येक संघात ४ परदेशी महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.

 
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भारतातील आणि जगातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये दोन संघांमध्ये महिलांची IPL स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यात स्मृती मानधनाचा ट्रेलब्लेझर्स संघ आणि हरमनप्रीत कौरचा सुपरनोव्हाज संघ यांच्यात IPL सामने झाले होते.
असे रंगतील ‘वुमन्स टी २० चॅलेंज’चे सामने
६ मे – सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स
८ मे – ट्रेलब्लेझर्स वि. व्हॅलोसिटी
९ मे – सुपरनोव्हाज वि. व्हॅलोसिटी
११ मे – अंतिम सामना