ISSF World Cup: अभिषेक वर्माला सुवर्णपदक

    दिनांक :27-Apr-2019
बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आणखी एक नेमबाजपटूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक मिळवले आहे. या कामगिरीसोबत अभिषेक वर्माने २०२० ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चीत केले आहे. २०२० ऑलिम्पिकला पात्र ठरणारा अभिषेक भारताचा पाचवा नेमबाजपटू ठरला आहे.
 
 
पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अभिषेकने आपली आघाडी कायम ठेवली होती. २४२.७ गुणांची कमाई करत अभिषेकने पहिले स्थान मिळवले. २९ वर्षीय अभिषेकचे नेमबाजी विश्वचषकातले हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. रशियाच्या आर्तेम चेर्नोसॉव्हला रौप्य तर कोरियाच्या सेयुंग्वो हानला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.