मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपकडून ‘बघाच तो व्हिडिओ’ ने उत्तर
   दिनांक :27-Apr-2019
वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात भाजपाची सभा सुरु आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपाकडून त्यांच्याच स्टाईलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपाकडून ‘बघाच तो व्हिडिओ’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले जात आहे.
 
 
राज यांचा प्रत्येक आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी फोटो व व्हिडिओचे पुरावे दाखवूनच खोडून काढला. 'राज ठाकरेंचा प्रचार फसला आहे. त्यांचा खोटा प्रचार विकला जाणार नाही', असंही शेलार यांनी यावेळी ठणकावून सांगितले.  'आता बघाच तो व्हिडिओ... खोलो इसका 'राज'... अशी या मेळाव्याची थीम होती. राज यांच्या आरोपांना उत्तर देताना शेलार यांनी यावेळी भाजप व सरकारची बाजू मंडली.  
 
सोशल मीडियावर राज यांच्या विरोधात काही लिहिलं गेल्यास त्यांचे कार्यकर्ते घरी जाऊन मारतात. अशा लोकांनी आम्हाला मुस्कटदाबीविषयी शिकवू नये. भाजपच्या सरकारनं मुस्कटदाबी केली असती तर राज ठाकरे एवढ्या सभा घेऊ शकले असते का? असा प्रश्नही त्यांनी राज ठाकरे यांना विचारला.