अॅव्हेंजर्स एन्डगेमची पहिल्याच दिवशी ५२ कोटींची कमाई
   दिनांक :27-Apr-2019
सिनेरसिकांना वेड लावणाऱ्या 'अॅव्हेंजर्सः एन्डगेम'नं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५२ कोटींची घसघसीत कमाई केली आहे. याआधी प्रदर्शित झालेला अॅव्हेंजर्सः 'इनफिनिटी वॉर'नं पहिल्या दिवशी ३१ कोटींची कमाई केली होती. 'एन्डगेम' हा 'अॅव्हेंजर्स' सिरीजमधील शेवटचा चित्रपट असल्यानं अॅव्हेंजर्सप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे.

 
 
'एन्डगेम' प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याबद्दलची सिनेरसिकांच्या मनात असणारी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तिकीटबारीवर भरघोस कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. तर, 'बाहुबली २: द कन्क्लुज'नं तिकीटबारीवरील आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. 'बाहुबली २'नं पहिल्याच दिवशी १२२ कोटींचा गल्ला जमावला होता.
अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ही या चित्रपटानं सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनापूर्वीचं चित्रपटाची १० लाखांहून अधिक तिकीटं विकले गेले होते. तर, या चित्रपटाचे एक तिकीट २,४०० रुपयाला विकले जात होते आणि तरीही जवळपास सगळे शोज हाउसफुल झाले होते.