बीसीसीआयकडून चार खेळाडूंच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

    दिनांक :27-Apr-2019
बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारांसाठी पुनम यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या चार खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. क्रिकेट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, BCCI ने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला या नावांची शिफारस केल्याचं कळत आहे. क्रिकेट प्रशासकीय समितीने या नावांची घोषणा केली.
 

 
आतापर्यंत ५३ क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९६१ साली सलीम दुराणी यांना पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार देण्यात आला. २०१८ साली महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. ज्येष्ठतेच्या निकषावर अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्यात येते.