साध्वी प्रज्ञा यांच्या विनंतीवरून प्रज्ञा ठाकूर यांचे नामांकन मागे
   दिनांक :27-Apr-2019
भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे साध्वी प्रज्ञा निवडणूक लढवीत असतानाच, प्रज्ञा ठाकूर नावाची आणखी एक महिला उमेदवारही अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे.
 
 
 
गुरुवारी साध्वी प्रज्ञा या महिला उमेदवाराच्या घरी गेल्या आणि त्यांना विनंती केली की, तुम्ही आपले नामांकन मागे घ्यावे. कारण, एकसारखी नावं असल्यामुळे मतदारात संभ्रम निर्माण होऊन मते विभागली जाऊ शकतात. साध्वी प्रज्ञा यांच्या विनंतीचा सन्मान करून प्रज्ञा ठाकूर यांनी आपले नामांकन मागे घेतले. यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी प्रज्ञा ठाकूर यांचे भगवी शाल पांघरून स्वागत केले व आभार मानले.
एकाच नावाच्या दोन उमेदवार असल्यामुळे भाजपाला काहीशी अडचण जात होती. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते चिंतीत होते. याचा उल्लेख स्वत: साध्वी प्रज्ञा यांनीही सिहोरच्या सभेत केला होता. गुरुवारी सकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांच्यासमवेत साध्वी प्रज्ञा ठाकूरच्या घरी गेल्या व त्यांना नामांकन मागे घेण्याची विनंती केली. ती प्रज्ञा ठाकूर यांनी मान्य केली. त्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. भोपाळमध्ये 12 मे रोजी मतदान आहे.