प्रेयसीसाठी चोरली मांजर ; प्रियकराला अटक
   दिनांक :27-Apr-2019
नागपूर : नागपुरात एका प्रेमवेड्याने आपल्या प्रेयसीच्या हट्टा खातर चक्क पर्शियन जातीची मांजर चोरल्याची घटना समोर आली आहे. या मांजरीची किंमत ३० ते ३५ हजार रुपयांच्या घरात आहे. डॉ. शाहीद यांच्या मालकीची ही मांजर पाहण्यासाठी विलेशा नावाची तरुणी बऱ्याचदा त्यांच्या घराजवळ जायची. तिला हि मांजर फार आवडली होती. प्रेयसीचा हा हट्ट पुरवण्यासाठी तिचा प्रियकर हर्षल याने ती मांजर चोरली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्धही चोरीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली  आहे.