या दिवशी प्रदर्शित होणार दबंग ३
   दिनांक :27-Apr-2019
मुंबई,
'दबंग' आणि 'दबंग २'च्या हाउसफुल यशानंतर आता सलमान खानचा 'दबंग ३' चालू वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खुद्द सलमाननंच या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवरून शेअर केलं आहे. पोस्टरच्या माध्यमातून २० डिसेंबर २०१९ ही प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे.

 
 
'दबंग ३'च्या नव्या पोस्टरमध्ये पोलिसाची वर्दी घातलेला सलमान आणि त्याच्या छातीवर 'चुलबुल पांडे' असा बॅज लावलेला दिसत आहे. सलमानचा चेहरा या पोस्टरमध्ये दिसत नाही. या पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २० डिसेंबर २०१९ अशी लिहिली आहे. सलमानच्या चाहत्यांना हे पोस्टर अतिशय भावलं आहे. चुलबुल पांडेच्या स्वागतासाठी सर्व चाहते सज्ज झाले असून या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.