राजस्थानपुढे हैद्राबादचे आव्हान

    दिनांक :27-Apr-2019
जयपूर,
राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघ आयपीएलमध्ये शनिवारी आमने- सामने येणार असून दोन्ही संघातील महत्त्वाचे विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत.सध्या राजस्थान संघाला हैदराबादच्या तुलनेत अधिक फटका बसला. संघातील बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर हे विश्वचषकासाठी इंग्लंडला परत गेले आहे.
 
हैदराबादला इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेयरेस्टो याची उणीव जाणवणार आहे. यानंतर राजास्थानचा प्रमुख खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच आठवड्यात आॅस्ट्रेलियाला परत जातील. हैदराबादने दहापैकी पाच सामने जिंकले, तर राजस्थानने ११ पैकी केवळ चारच सामने जिंकले आहेत. 
 
गोलंदाजीत आर्चर, वरुण अ‍ॅरोन ओशने थॉमस, धवल कुलकर्णी आणि जयदेव उनाडकट यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हैदराबाद संघाकडून वॉर्नर २९ एप्रिल रोजी यंदा अखेरचा आयपीएल सामना खेळेल. वॉर्नरच्या जागा मार्टिन गुप्तिल घेऊ शकतो.