मोदींच्या विजयासाठी मुस्लिम महिलांची माहीम दर्ग्यात प्रार्थना

    दिनांक :27-Apr-2019
 मुंबई: पुढील सरकारही नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात असावे आणि मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआ मोठ्या विजयासह पुन्हा एकदा निवडून यावे, यासाठी मुस्लिम महिलांनी मुंबईतील माहीमच्या दर्ग्यात प्रार्थना करून दुवा मागितली.
मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार आल्यानंतर देशातील अनेक मोठे प्रश्न सहजपणे सुटले आहेत. गावांमधील परिस्थिती सुधारली असून, उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस पोहचला. चूल पेटवून डोळ्यात धूर जाणार्‍या महिलांचे हाल या योजनेमुळे कमी झाले. त्यांना आणखी एक संधी दिली पाहिजे, असे मत या महिलांनी व्यक्त केले.
 

 
 
भाजपा आणि मोदींची सत्ता आल्याने आपला देश प्रगती करीत आहे. पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान झाले पाहिजे, ही आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही या दर्ग्यात दुवा मागितली. मोदी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक पातळीवरही मोदींनी देशाचे नाव उंचावले आहे. त्यांनी दहशतखोर पाकिस्तानलाही चोख प्रत्युत्तर दिले. देश विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करीत आहे, मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले तर देशाची आणखी चांगली प्रगती होईल, असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला.