नरेंद्र मोदी यांच्यापासून देशाला सर्वाधिक धोका- ममता बॅनर्जी
   दिनांक :27-Apr-2019
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा वाढता प्रभाव पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हतबल झाल्या आहेत. आता मोदींवर नवा आरोप करताना, मोदींपासून देशाला सर्वाधिक धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा धोका ४४० व्होल्टस्‌च्या करंटसारखा आहे, असेही त्या म्हणाल्या.
 

 
 
 
आमचा तृणमूल पक्ष जिंकला तर देशाचे कोणतेही नुकसान होणार नाही. हुगळी येथे तृणमूल उमेदवार रत्ना डे नाग यांच्या प्रचारार्थ सभेत त्यांनी ही विधाने केली. भाजपा पुन्हा सत्तेत आली आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशापुढे मोठा धोका निर्माण होईल. म्हणून पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपाला मुळीच मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी केले. भाजपाला हिंदूबद्दल काहीही आदर नाही. असे असताना हा पक्ष स्वत:ला हिंदूंचा पक्ष कसा काय म्हणवितो. मोदींमुळेच देशात अनेक अडचणी निर्माण होत आहेत आणि दंगलीसारखी स्थिती हा पक्ष निर्माण करीत आहे.
मोदी नेहमी खोटे बोलतात. त्यांच्याजवळ बोलण्याचा मोठा जखीराच आहे. भाजपा हा अडाण्यांचा पक्ष आहे. भाजपा आपल्या बाजूने मते वळविण्यासाठी पैशाची मदत घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला. डाव्या पक्षांवर प्रखर हल्ला चढविताना ममता म्हणाल्या, हे डाव्यांचे गुंड आता भाजपाचे गुंड झाले आहेत.
पप पप