शिर्डीच्या सभेत गडकरींना आली भोवळ

    दिनांक :27-Apr-2019
 
 
 
शिर्डी:  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज शिर्डी लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित केले. प्रचंड उन्हामुळे त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले यानंतर ते थोडावेळ खुर्चीवरच बसून आराम केला.  प्रचार सभा आटोपल्यानंतर ते श्री साई बाबांच्या समाधी दर्शनाकरिता मंदिरात रवाना झाले मंदिरात दर्शन केल्यानंतर थोड्याच वेळात नागपूरकडे रवाना होणार आहेत. त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत असून, काळजी करण्याचे कारण नाही. ज्या हितचिंतकांनी या काळामध्ये विचारपूस केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.