पाकिस्तानी घुसखोराला कच्छमध्ये अटक
   दिनांक :27-Apr-2019
भुज,
भारतात अवैधरीत्या प्रवेश करणार्‍या एका पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात शुक्रवारी अटक केली.
 

 
 
भारतात प्रवेश करताच पहाटे साडेतीन वाजता या घुसखोराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ताजगी मेघवाल, असे या 28 वर्षीय घुसखोराचे नाव आहे. तो पाकिस्तानमधील िंसध प्रांतातील रहिवासी असून, त्याच्याजवळून कंगवा, कपडे आदी वस्तू आढळून आल्या. प्राथमिक चौकशीनंतर त्याला बालासार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.