आलिया-रणबीर गेले मुव्ही डेटवर
   दिनांक :27-Apr-2019
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर आणि आलिया एकमेकांत गुंतले आणि सोनम कपूरच्या लग्नात त्यांनी एकत्र हजेरी लावत आपले नाते जगजाहीर केले. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले.

आता नुकतेच त्या दोघांना मुंबईत एकत्र पाहाण्यात आले. ते दोघे मुव्ही डेटवर गेले होते. अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे नुकतेच स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत झाले. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. लोअर परेल मधील पीव्हीआरमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले. या स्क्रिनिंगला आलिया आणि रणबीर यांना एकत्र पाहाण्यात आले. रणबीर जीन्स आणि चेक्सच्या शर्टमध्ये दिसला तर आलिया जीन्स आणि टॉपमध्ये दिसली. यावेळी आलिया रणबीरच्या मागोमाग चालताना दिसली तर गर्दीतून मार्ग काढताना तो तिची काळजी देखील घेताना दिसला. हे दोघे हा चित्रपट पाहाण्यास खूप उत्सुक असल्याचे त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळून येत होते.