महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीबाबत रोहितने केले 'हे' विधान

    दिनांक :27-Apr-2019
आयपीएल 2019,
 
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला ताप आल्यामुळे खेळता आले नाही. या सामन्यात चेन्नईला धोनीची उणीव प्रकर्षाने जाणवली. 155 धावांचे माफक लक्ष्यही चेन्नईच्या संघाला पार करता आलेले नाही. चेन्नईचे दिग्गज फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. मुंबई इंडियन्सने हा सामना 46 धावांनी जिंकला. या सामन्यातील धोनीच्या अनुपस्थितीबाबत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मोठे विधान केले आहे.
 
 
 
सामन्यानंतर रोहित म्हणाला,''महेंद्रसिंग धोनीची अनुपस्थिती हा आम्हाला मोठा दिलासा होता आणि त्यामुळे आमचे मनोबल उंचावले. धोनीचे संघात असणे हेच खूप असते. धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईचा संघ धावांचा पाठलाग करू शकत नाही. ते चाचपडतात. त्यामुळे नाणेफेक गमावणे हे आमच्यासाठी बरेच झाले. संघातील खेळाडूंनी त्यांची भूमिका चोख बजावली.''