रूपाली कांबळे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड
   दिनांक :27-Apr-2019
 
उद्या पंढरपूर येथे होणार पुरस्कार वितरण
 
अमरावती: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या व साहित्यिक रूपाली कांबळे यांची राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यांना हा पुरस्कार रविवार, 28 एप्रिल रोजी पंढरपूर येथे दिल्या जाणार आहे.
श्रीसाई समर्थ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हा पुरस्कार रूपाली कांबळे यांना दिल्या जाणार आहे. आपल्या लेखणीतून कांबळे यांनी आंबेडकरी चळवळ जागृत करून समाजासाठी योगदान दिले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक वृत्तपत्रांमध्ये चळवळीबाबत सामाजिक साहित्याचे लिखाण केले आहे. दर्जेदार लेख, कविता, लिहून त्यांनी समाजाला दिशा दिली आहे.
या कार्याची दखल घेऊन श्रीसाई समर्थ फाऊंडेशनने त्यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा विठ्ठल इन हॉल एसटी स्टॅण्डसमोर शिक्षक सोसायटी पंढरपूर येथे 28 एप्रिल रोजी पार पडणार आहे.