विश्वचषकाच्या २२ पंचांमध्ये भारताचे सुंदरम रवी

    दिनांक :27-Apr-2019
इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचाचा २२ जणांच्या सामनाधिकाऱ्यांच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.
 
 
४८ दिवसांच्या विश्वचषकासाठी एकूण १६ पंच, सहा सामनाधिकारी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) निवड केली आहे. यात डेव्हिड बून, ब्रुस ऑक्सनफोर्ड, कुमार धर्मसेना, आलीम दर यांचा समावेश आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची नेमणूक राऊंड रॉबिन टप्प्यांचे सामने संपल्यानंतर जाहीर केली जाईल.