पोलिस - नक्षल चकमक, दोन नक्षल्यांना कंठस्नान
   दिनांक :27-Apr-2019
गुंडूरवाही, पुलनार पहाडीजवळील घटना 
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या गुंडूरवाही आणि पुलनार गावानजीकच्या पहाडीजवळ सि - ६० पोलिस जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली असून दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती असून शोधमोहिम तिव्र करण्यात आली आहे. मृत नक्षल्यापैकी एक डीव्हीसी कमांडर असल्याची माहिती आहे.
 
 
 
 सि - ६० चे जवान आणि प्राणहिता मुख्यालयातील पथक नक्षलविरोधी शोधमोहिम राबवित असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणला. यामध्ये पोलिस विभागाची कोणतीही हाणी झाली नाही. यानंतर झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षली ठार झाले आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिस विभागाचे हेलिकाॅप्टर रवाना केले असल्याची माहिती दिली आहे.