अबब एकाच ठिकाणी निघाले 3४ साप
   दिनांक :28-Apr-2019
पिल्लाची संख्या जास्त
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
 
अचलपूर: येथील नामदार गंज (बेगमपुरा) परिसरात एक-दोन नव्हे तब्बल ३५ साप निघाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपरोक्त परिसरात रहिवाशी असलेले मोतीराम लवटे यांच्या घराच्या दाराजवळून अचानक साप निघायला लागले. काही नालीत तर काही रस्त्याच्या रपट्या खालुन निघाल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली.
शुक्रवारी मध्यरात्री व शनीवारी संध्याकाळी ७ साप निघाले. रविवारी सकाळी घोळे ह्यांचे घराजवळील रस्त्यावर ३ साप निघाले. असे एकूण ३५ साप निघाले. यातीत ६ ते ७ मोठे म्हणजे अडीच ते तीन फूट लांब होते तर बाकी अर्था ते एक फूट व काही त्यापेक्षा लांब होते. सर्पमित्र प्रितम आसोलकर यांनी काहींना पकडून जंगलात सोडले. त्यांनी नागरीकांना आवाहन केले की, जिवानीशी ठार मारू नका ते बिनविषारी असून पाणदिवड जातीचे आहेत येथून नाली वाहत असल्याने थंडावा आहे त्यामुळे ते जन्मलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
साफसफाईची मागणी
नामदार गंज भागात सांडपाण्याच्या काही नाल्या कच्च्या आहेत. तर काही पक्क्या आहेत. पक्क्या गटारी नियमीत साफ होत नाहीत. त्यामुळे त्या तुडूंब भरतात व थंडावा निर्माण झाल्याने सापांचे आश्रयस्थान तर होतेच शिवाय रहीवाशांच्या आरोग्यासोबत जिवाला धोका निर्माण होतो. त्यासाठी नगर पालीकेने येथील गटारी नियमितपणे साफ कराव्यात व त्या नव्याने बांधून द्याव्यात तसेच येथील काही रहिवाशांनी शेणाचे उकीरडे तयार केले आहे ते उचलण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे.