'या' दिवशी प्रदर्शित होणार 'गुड न्यूज'
   दिनांक :28-Apr-2019
सुपरस्टार अक्षय कुमारच्या 'गुड न्युज' या नव्या चित्रपटाची चर्चा बॉलिवुडमध्ये जोरदार रंगत आहे. राज मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय सोबत करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ, कियारा आडवाणी, जिमी शेरगिल, अंजना सुखमानी यांसारखे अन्य कलाकार काम करणार आहेत.
 
 
 
हा चित्रपट चालू वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, २७ डिसेंबर २०१९ जाहीर केली आहे. या नव्या चित्रपटासाठी अक्षयचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणाऱ्या 'दबंग ३'ला हा चित्रपट टक्कर देणार आहे. 
 
 
 
'गुड न्युज' नंतर अक्षय कुमार लवकरच 'मिशन मंगल' आणि 'हाउसफुल ४' मध्ये झळकणार आहे. तर करीना कपूर 'तख्‍त' या चित्रपटातून अनिल कपूर, आलिया भट्ट, जाह्नवी कपूर, भूमी पेडणेकर यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.