बाभूळ
   दिनांक :28-Apr-2019
 
 
धुर्‍यावर उभी बाभूळ
डोक्यावर उन्ह घेऊन....
बहरली हिरवीगार
अंगावर काटे रोवून....
सावलीत मिळे तिच्या
बकर्‍यांना हिरवा चारा...
दोन घोट पाणी पितो
इथे गुराखी सारा....
बाभूळ शान रानाची
उन्हात देई दिलासा...
जणू अखंड सेवेचा
घेतला तिनं वसा...
दादा, नको तोडू रे
ही श्रीमंत बाभूळ....
सग्या सोयर्‍यासारखी ही,
हिचं सेवेचं कूळ.....
ही नसली तर मग हे
रान खरंच रे माजेल
डोक्यावरचं उन्ह कोपेल
जेव्हा बारा वाजेल.....
दीपक वानखेडे
9766486542