झडशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप
   दिनांक :28-Apr-2019
*रुग्णसेवा देण्यासाठी एकही कर्मचारी नाही
*मध्यरात्री घडला प्रकार
*वैद्यकीय अधिकारी दिर्घ रजेवर
सेलू: तालुक्यातील झडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचाराकरिता आणलेल्या रुग्णाला सेवा देन्यायासाठी एकही कर्मचारी हजर नसल्याने संतापलेल्या तरुणांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले, हा प्रकार काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडला
कुलूप ठोकण्याची प्रक्रिया केलेले युवा सघर्षं मंच चे कार्यकर्ते गौरव तळवेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार काल रात्री खेडेगावातून हृदय विकाराने ग्रस्त असलेला एक रुग्ण प्राथमिक उपचार घेण्याकरिता झडशी येथील आरोग्य केंद्रात आला होता, या आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी कुणीतरी कर्मचारी हजर असने अपेक्षित असताना यावेळी त्याठिकाणी कुणीही हजर नव्हते. तर आरोग्य केंद्रात लाईट, नळ, कुलर, पंखे ,ऐसी सर्व सुरू होते. रुग्णाला उपचाराची गरज असल्यामुळे थोडा वेळ थांबून त्याला दुसरीकडे रवाना केले व दवाखान्यात कर्त्यव्यावर असलेल्या कर्मचार्याची वाट बघितली परंतु मध्यरात्री पर्यंत कुणीही कर्मचारी इकडे फिरकला नाही, नंतर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र देवगडे याना मोबाईल वर संपर्क केल्यानंतर ते दिर्घ रजेवर असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे संतापलेल्या युवा संघर्ष मंच चे गौरव तळवेकर आणि कार्यकर्त्यांनी दवाखान्यातील नळ, लाईट, कुलर, ऐसी बंद करून दवाख्याण्याला कुलूप ठोकले व त्या वेळेस कर्त्यव्यावर असणाऱ्या कर्मचार्यावर कारवाई करा व रिक्त पदे