आजचे राशी भविष्य, दि. २८ एप्रिल २०१९
   दिनांक :28-Apr-2019

मेष - नोकरी बदलण्याचे मनात येईल परंतु योग्य विचार करुन निर्णय घ्या. तब्येतीची काळजी घ्या. कामात घाई करु नका नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत एखाद्या चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवन आनंददायी राहील.

वृषभ - व्यवसायात फायदा होईल. नोकरदार लोकांना बढतीची शक्यता आहे. सहकाऱ्यांची मदत मिळेल. जोडीदाराची मदत मिळेल. अविवाहितांच्या प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. कामाचं टेन्शन कमी होईल. करियरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल.

मिथुन - सक्रिय राहाल. ऑफिसमध्ये नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते. रखडलेली कामं पूर्ण होतील. समाजिक कामांसाठी लोकांशी भेट होऊ शकते. उत्साही वाटेल. तब्येत चांगली राहील. जोडीदाराची मदत मिळेल.

कर्क - विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.ऑफिसमध्ये काही लोकांवर तुमचा प्रभाव राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यास दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक सुख मिळेल. सावध राहा.

सिंह - अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही, व्यवसायात सावध राहा. एखाद्या कामात यश मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यवसायाच्या बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. ऐकटेपणापासून दूर राहा. आज मिळणारे पैसे पुढील कामासाठी जपून ठेवा. जोडीदारासोबत प्रवास होऊ शकतो.

कन्या - नोकरी, व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होऊ शकते.

तुळ - रखडलेली कामं पूर्ण होतील. नोकरी, व्यवसायात वेळेत मदत न मिळाल्याने समस्या येऊ शकते. काही लोकांकडून तुमच्या कामासाठी विरोध होईल. काही नवं करण्याचा विचार कराल. येणाऱ्या पुढील दिवसांसाठी काही महत्त्वपूर्ण योजना आखू शकता. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - व्यवसायात फायदा होण्याचा योग आहे. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. राहिलेली कामं पूर्ण होतील. जुन्या समस्या मार्गी निघतील. नवीन संधी मिळतील. नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे. फिरायला जाण्याचा बेत आखाल. जोडीदाराची मदत मिळेल. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

धनु - नोकरदारवर्गातील व्यक्तींच्या कामात अडथळे येतील. व्यवसायात सावध राहा. वायफळ कामात वेळ वाया जाईल. कामासाठी बाहेर जावे लागू शकते. प्रेमसंबंधांमध्ये काही बदल घडू शकतात. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे.

मकर - जुन्या समस्या संपण्याची शक्यता आहे. दिवस अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. उत्साही राहाल. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. जोडीदाराशी मतभेत होतील. बोलण्यावर ताबा ठेवा. तब्येत ठीक राहील.

कुंभ - करियरसाठी दिवस चांगला आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. चांगले बदल होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात अनुभवी लोकांचा सल्ला मिळेल. धनलाभ होऊ शकतो. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. प्रेमसंबंधांसाठी दिवस चागंला आहे.

मीन - अचानक फायदा होईल. जोडीदाराच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. अधिक उत्पन्नांसाठी नवीन संधी येतील. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सावध राहून बोला.