तहानलेल्या हरणाचा अपघाती मृत्यू
   दिनांक :28-Apr-2019
हिंगणघाट : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती बाजूला इंदिरागांधी वार्ड येथे सकाळी शतपावली करणाऱ्या लोकांना मृत हरण आढळून आले . मृत हरणाची बातमी शहरात पसरताच शहरातील अनेक लोकांनी  हरीण पाहण्यासाठी गर्दी केली होती. हिंगणघाट शहराच्या सभोवताल जवळ कुठेही जंगल नसल्याने हे हरीण शहरात आलेच कशे याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करत  होते. यातही कुत्र्यांनी किव्हा कुठल्या विध्वंसक प्राण्यांनी या हरणाची शिकार केली असावी असली कुठलीही मोठी जखम या हरणाला दिसून येत नसल्याने या हरणाची शिकारच झाली असावी या चर्चेला उधाण आले होते .काही नागरिकांनी या बाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली .सकाळी ८ च्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी वनपाल राजू दा.गिरी , वनरक्षक कल्याणी गोंडाने ,राजू धनविज हे घटनास्थळी दाखल झाले .मृत हरणाला वन विभागाने शवविच्छेदनासाठी नेण्यात आले . डॉक्टर सुरेश मंडलिक यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहिती नुसार या हरणाच्या डाव्या पायाला जखम होती. ही जखम अपघातात झाली असल्याचे दिसून येत होते तसेच या हरणाला घासत नेल्याचे देखील निशाण होते . मार लागल्याने त्याचे रक्त जमा होऊन हरणाला चिपकलेले दिसून आले . हरणाच्या मागच्या बाजूस गिट्टी खुपसून मार लागल्याचे देखील शवविच्छेदन करतांना आढळून आले. यामुळे या हरणाचा मृत्यू हा घातपात नसून अपघाती आहे हे स्पष्ट झाले. पाण्याच्या शोधात जंगलातून वन्यजीव प्राणी शहराकडे येत आहे. यामुळे हे हरण देखील पाण्याच्या शोधात भटकून हिंगणघाट शहरातील इंदिरा गांधी वॉर्ड मध्ये आले असेल.यात या हरणाला वाहनाचा अपघात होऊन मृत्यू झाला.