नगरमध्ये लाखों रुपयांची देशी दारू जप्त

    दिनांक :28-Apr-2019
नगर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाथर्डी तालुक्यातील तीसगाव-मिरी रोडवरील आडगाव शिवारात एका कारमधून चार लाख 94 हजार 928 रुपयांची देशी दारू जप्त केली़ ही कारवाई आज, रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली़
तीसगाव रोडने अवैध दारूसाठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने आडगाव शिवारात सापळा लावला़ काही वेळातच समोरून आलेली कार अडवली. कार थांबवून चालक कारमधून पळून गेला़ यावेळी कारमधून देशी दारूच्या बाटल्यांचे खोके ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़.