पत्रिकेत नाव टाकले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

    दिनांक :28-Apr-2019
मुंबई: लग्नपत्रिकेत नावे टाकण्याचा वाद विकोपाला जाऊन नवर्‍याने बायकोची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना कल्याण येथे घडली आहे. या घटनेने काही दिवसांवर लग्न आलेल्या घरात शोककळा पसरली आहे.
मोहन महाजन, असे पत्नीची हत्या करणार्‍या पतीचे नाव आहे. मोहन आणि त्याची पत्नी मनिषा यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळे मोहन हा वेगळा राहत होता. मात्र, मे महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने तो पत्नीसोबत राहायला आला होता.
 

 
 
गुरुवारी रात्री मुलीच्या लग्नपत्रिकेत टाकलेली नावे आणि मानपान यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले आणि त्यातून मोहन याने पत्नी मनिषाची चाकूने भोसकून हत्या केली. यावेळी आईला वाचवायला आलेल्या मुलीवरही त्याने चाकूने वार केले. या घटनेनंतर मोहन पळून गेला होता. मात्र, बाजारपेठ पोलिसांनी काही तासातच त्याला सापळा रचून अटक केली. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.